खारेपाटण मध्ये ५ दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण शहरातील घरगुती गणपती बाप्पाचे विसर्जन तसेच गौरी गणपती चे विसर्जन शनिवारी भक्तीपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात सायंकाळी उशिरा पर्यंत करण्यात आले. खारेपाटण येथील घोडेपाथर बंदर तसेच खारेपाटण जैनपार येथे आनंदी वातरणात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात गणपतीचे विसर्जन करण्यात आले.यावेळी सुहासिनी महिलांनी गौराईचे मनोभावे पूजन करून विसर्जन केले. यावेळी खारेपाटण बाजारपेठ मधून वाजत गाजत गणपतीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.यामध्ये मुले – मुली व महिला – पुरुष तसेच अबाल वृद्धांनी सहभाग घेतला होता. गेले पाच दिवस गणपतीची प्रतिष्ठापना केल्यानंतर आज भक्तीभावाने बाप्पाचे विसर्जन करताना गणेश भक्त भाऊक झाले. विसर्जन स्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

error: Content is protected !!