पिडब्ल्यूडी उपअभियंता जोशी यांची कार्यतत्परता
वैभववाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा घाटात कोसळली दरड हटविण्यात आली असून सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून वाहतूक खुली करण्यात आली आहे. आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. पिडब्ल्यूडी चे उपअभियंता विनायक जोशी यांनी तात्काळ घटनास्थळी जात जेसीबी च्या साहाय्याने दरड हटवून रस्ता सायंकाळी साडेपाच वाजता वाहतुकीस खुला केला.अवघ्या तासाभरात दरड हटवून रस्ता वाहतुकीस खुला करत उपअभियंता जोशी यांनी आपल्या कर्तव्यदक्षतेचे उदाहरण दिले आहे.जोशी यांना कनिष्ठ अभियंता निलेश सुतार,
वाहन चालक नितीन साटम व संदेश आग्रे यांचे देखील सहकार्य लाभले.

