९९ हजारांची अवैध दारू जप्त; कसालमधील ज्ञानेश्वर कामतेकर वर गुन्हा दाखल
ओरोस (प्रतिनिधी) : ९९ हजार ६४८ रुपयांची दारू बाळगल्या प्रकरणी कसाल तेलीवाडी येथील ज्ञानेश्वर सहदेव कामतेकर (वय ७३) यांच्यावर सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ८ वाजता कारवाई करीत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे उपनिरीक्षक नितीन कदम यांनी फिर्याद दाखल केली आहे. संशयित आरोपी ज्ञानेश्वर कामतेकर यांच्या राहते घराचे मागील बाजूस मोकळ्या पडवीत ही दारू आढळून आली आहे.
या कारवाईत 17 हजार 280 रुपये किमतीचे डॉकटर ब्रँड कंपनीचे एकूण 9 पुठ्याचे बॉक्स आढळून आले आहेत. 1 हजार 584 रुपये किमतीचा रम एक्स एक्स एक्स कमांडर कंपनीचा एक बॉक्स, 17 हजार 280 रुपये किमतीचे डीएसपी डिलक्स व्हिस्की कंपनीचे एकूण 3 पुठ्ठ्याचे बॉक्स, 6 हजार रुपये किमतीचा रॉयल चॅलेंज कंपनीचा एक बॉक्स, ६ हजार रुपये किमतीचा रॉयल स्टॅग कंपनीचा एक बॉक्स, 1 हजार 584 रुपये किमतीचा हॉनी ब्लेंड कंपनीचा एक बॉक्स, 31 हजार 200 रुपये किमतीचे नॅशनल dustillerise कंपनीचे एकूण 13 बॉक्स, 8 हजार 280 रुपये किमतीचे किंगफिशर कंपनीचे एकूण 3 बॉक्स, 5 हजार 760 रुपये किमतीचा ओल्ड मंक कंपनीचा एक बॉक्स, 2 हजार 700 रुपये किमतीचा IB Imperial Whisky कंपनीचा एक बॉक्स, 1 हजार 980 रुपये किमतीचा RUM XXX Commander कंपनीचा एक बॉक्स अशी एकूण 99 हजार 648 रुपये किमतीची दारू पकडण्यात आला आहे. बेकायदा, बिगर परवाना आपल्या ताब्यात बाळगल्या प्रकरणी ज्ञानेश्वर कामतेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.