मुंबई (प्रतिनिधी) : प्रदूषणाबाबतच्या नियमाचे उल्लंघन केल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहीत पवार यांच्या बारामती अॅग्रो प्लॅन्टवर कारवाई करण्यात आली आहे. बारामतीमधील बारामती अॅग्रो या प्लॅन्टवर रात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने कडक कारवाई केली आहे. रोहित पवार यांना रात्री 2 वाजता नोटीस दिली असून 72 तासांत प्लांट बंद करण्याचे आदेश नोटीसीच्या माध्यमातून देण्यात आले आहे. रोहित पवार यांनी स्वतः ट्वीट करत माहिती दिली आहे.