खारेपाटण टाकेवाडी प्रासादिक भजन मंडळाचा गौरव

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील टाकेवाडी प्रसदिक भजन मंडळाचा उत्कृष्ट भजन सादरीकरण केल्याबद्दल खारेपाटण गावचे उपसरपंच श्री महेंद्र गुरव यांच्या शुभहस्ते नुकताच संभाजी नगर गुरववाडी,खारेपाटण येथे शाल श्रीफळ आणि पुषपगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या या भजन कलेचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

सध्या गौरी – गणपतीचा उस्तव घरोघरी साजरा करण्यात येत असून गणेश चतुर्थीत बाप्पाच्या समोर आरत्या व भजन सादर करून भक्तीचा जागर केला जातो.यातच खारेपाटण टाकेवाडी येथील युवक एकत्र येऊन भजन प्रासादिक मंडळाची स्थापना करून विविध ठिकाणी भजना सारखी पारंपारिक लोककला जोपासत या गणेश चतुर्थीत भजन सादर करून भक्तांना मंत्रमुग्ध केले आहे.

खारेपाटण टाकेवाडी भजन प्रसादीक मंडळाचे बुवा श्री विजय रवींद्र सावंत,दीपक गजानन मिशाल, श्रीकांत विजय सुतार,यांच्या नेतृत्वखाली पखवाज वादक मंदार सुनील सुतार तसेच मंदार सुनील सुतार,संतोष वसंत शेट्ये,दीपक पांडुरंग सुतार,गणेश महादेव सुतार, राकेश नारायण मोरे,सुशांत गोविंद मिशाळ,ऋतिक रमेश मिशाळ, आकाश संजय सुतार,विहान विजय सावंत,समर्थ कृष्णा सुतार आदी ग्रमस्थांचा या भजन मंडळामध्ये समावेश आहे. खारेपाटण गावचे उपसरपंच श्री महेंद्र गुरव यांच्या घरी बसविण्यात आलेल्या गणेश मूर्ती समोर नुकतेच टाकेवाडी येथील या भजन मंडळाने उत्कृष्ट भजन सादर केल्याबद्दल उपसरपंच महेंद्र गुरव यांच्या शुभहस्ते गुरव बंधूंच्या हस्ते गौरव करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!