देवगड ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्यसेवेवर विघ्न ; 3 ऑक्टोबरपासून नर्स चे काम बंद आंदोलन

कंत्राटी स्त्री रोग तज्ञ डॉ. रघुनाथ जोशीही करणार रुग्णसेवा बंद

देवगड (प्रतिनिधी) : देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये अधिपरिचारिका पदे रिक्त असल्याने सध्या या रुग्णालयाचा कारभार केवळ तीन अधिक परिचारिकांवर सुरू आहे मात्र रात्रंदिवस काम करावे लागत आहे. तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या रोशालाही तोंड द्यावे लागत आहे. यामुळे आपण दोन ऑक्टोबर पर्यंत जर रिक्त असलेली सात अधिपरिचारिका पदे भरली नाहीत तर 3 ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलन करीत असल्याची नोटीस देवगड ग्रामीण रुग्णालयातील तीन अधिपरिचारिकांनी दिली आहे. त्याचबरोबर येथे कंत्राटी पद्धतीने असलेल्या स्त्री रोग तज्ञ डॉक्टर रघुनाथ जोशी यांनीही आपली या रुग्णालयातील सेवा बंद करत असल्याचे पत्र वैद्यकीय अधीक्षक विटकर यांना दिले आहे.

अधिपरिचारिकानी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ग्रामीण रुग्णालय देवगड येथे गेले तीन महिन्यापासून पुरेसा स्टाफ अधिपरिचारक नसल्याची बाब प्रशासनाला तसेच वरीष्ठ अधिकाऱ्यांना कळवूनदेखील कोणी दखल घेत नसून, तसेच महिन्याला ४० ते ५० डिलिव्हरी आणि १५ ते २० ऑपरेशन होतात. तसेच महिन्याला २५० ते 300 आंतर रुग्ण दाखल होत असून, बाहय रुग्ण विभागात मासिक तीन ते साडेतीन हजार रुग्ण उपचार घेतात त्याच प्रमाणात इंजेक्शन व ओपीडी होते. तसेच गरोदर माता तपासणी लसीकरण इतर राबवत असलेले राष्ट्रीय कार्यक्रम होत असून या सांभाळण्यासाठी फक्त 3 परिचारिका उपलब्ध आहेत.

एक परिवारीला दैनंदिन आकडेवारी, औषध मागणी, औषधसाठा ठेवने वरीष्ठाच्या मिटींग करने मासिक रिपोर्ट या साठी लागत असल्यामुळे वरील सर्व रुग्णालयीन कामकाजासाठी केवळ तीन अधिपरिचारिका उपलब्ध आहेत या बद्दल वारंवार सर्वांना कळविले असून कोणीही दखल घेत नाही. मात Emergency उद्भवल्यास दोन परिचारीका शिल्लक राहत असून रुग्णालयीन कामकाजाचा अतिरिक्त ताण पडत आहे. तरी दि ०२/१०/२०२३ पूर्वी अधिपरिचारिकाच्या सातही जागा भरल्या गेल्या नाहीत तर अधिपरिचारिका दि. ०३/१०/२०२३ पासून कामबंद आंदोलन करीत आहेत. या निवेदनावर एन. एस. जाधव, व्ही आर पारकर,एम एम मान्येकर यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!