सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हयातील ४४१ एस.टी. कर्मचाऱ्यांना १५ ऑगस्ट २०२३ रोजी मिळणारी सण उचल रक्कम अद्याप एस.टी. प्रशासनाकडून मिळालेली नाही. सध्या जिल्हयामध्ये गणेशोत्सव साजरा करीत असताना सण उचल न मिळाल्याने एस.टी. कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. याबाबत भाजपा जिल्हा कामगार आघाडी सिंधुदुर्ग चे संयोजक अशोक राणे यानी एस.टी. कर्मचाऱ्यांसह आमदार नितेशजी राणे यांची भेट घेऊन त्याना सण उचल न मिळाल्याची समस्या लेखी निवेदनाद्वारे सादर केली. त्यानुसार आमदार नितेशजी राणे यानी एस.टी.महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांचेशी संपर्क साधून सण उचल त्वरीत देण्याबद्दल चर्चा केली असून लवकरच ४४१ एस.टी. कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आमदार नितेश राणे यानी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाची त्वरीत दखल घेतल्याबद्दल अशोक राणे व कर्मचारी वर्ग यानी आभार मानले आहेत.
आ.नितेश राणेंच्या पाठपुराव्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार सण अग्रीम
