संस्थेच्या प्रगतीत सभासद मोलाचा वाटा…. नासीर काझी
खारेपाटण (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रेसर पतसंस्थामध्ये आपल्या खारेपाटण सहकारी संस्थेचे नाव असून संस्थेने आजपर्यंत केलेल्या प्रगतशील वाटचालीत संचालका सोबतच सभासद हा सुधा तेवढाच महत्वाचा घटक असून त्यांच्या सहकार्य शिवाय सहकार वाढू शकत नाही. त्यामुळे त्यांचा वाटा हा मोठा असल्याचे भावपूर्ण उदगार प.पूज्य भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खारेपाटण या संस्थेचे चेअरमन नासीरभाई काझी यांनी संस्थेच्या ३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदाना मार्गदर्शन करताना काढले. प.पूज्य भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खारेपाटण या सहकारी संस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन नासीर काझी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच खारेपाटण हायस्कूलच्या चंद्रकांत परिसा रायबागकर सभागृहात संपन्न झाली. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन राजेंद्र ब्रम्हदंडे संस्थेचे विद्यमान संचालक प्रवीण लोकरे, संतोष पाटणकर, श्रद्धा देसाई, संतोष हरयान,विजय कुडतरकर, नंदकिशोर कोरगावकर,परवेज पटेल,राजेंद्र वरूनकर, मनस्वी कोळसुलकर,तज्ञ संचालक भावेश कर्ले, मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यलक्षी संचालक शुभम मोरे आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच या वार्षिक सर्वसाधारण सभेला खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव, ग्रा.पं.सदस्य गुरूप्रसाद शिंदे, जयदीप देसाई, संस्थेचे माजी संचालक शरद कर्ले, खारेपाटण गट विकास सेवा सोसायटीचे व्हाइस चेअरमन सुरेंद्र कोरगावकर,संचालक इस्माईल मुकादम, संस्थेचे सचिव अतुल कर्ले, सामाजिक कार्यकर्ते महेश कोळसुलकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने १०वी /१२ वी परीक्षेत चांगले यश संपादन केलेल्या संस्थेच्या सभासद पाल्यांचा सत्कार समारंभ अध्यक्ष नासीर काझी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच संस्थेच्या ज्येष्ठ सभासदांचा देखील विशेष सत्कार पर्यावरण पूरक वृक्ष संवर्धन रोप भेट देऊन संस्थेचे व्हाइस चेअरमन राजेंद्र ब्रम्हदंडे व माजी चेअरमन प्रवीण लोकरे यांच्या शुभहस्ते देऊन करण्यात आला. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम मोरे यांनी संपूर्ण वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाज चालविले. या सभेत संस्थेच्या हिताचे असणाऱ्या विविध विषयांवर खलोल चर्चा झाली. तर सभा यशवी पार पाडण्यासाठी संस्थेचे सचिव सत्यवान खांडेकर लिपीक गणेश जामसंडेकर यांनी सहकार्य केले. शेवटी सर्वांचे आभार अध्यक्ष नासीर काझी यांनी मानून राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली.