ईद आणि गबेश विसर्जन एकाच दिवशी असतानाही राखला चोख बंदोबस्त
कणकवली (प्रतिनिधी): पोलीस निरीक्षक अमित यादव यांचा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत , अशोक करंबेळकर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 11 व्या दिवशीचे गणेश विसर्जन आणि ईद ए मिलाद सण एकाच वेळी संपन्न होत असताना, सर्वाधिक तणावाखाली असणाऱ्या पोलीस खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी ज्या संयमाने व करारी पणाने परिस्थिती हाताळली व सर्वसामान्य नागरिकांना आनंदाने व उत्साहपूर्ण पध्दतीने सण साजरे करण्यात सहाय्य केले, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही कणकवली कर व व्यापारी मित्र मंडळ यांच्या वतीने पोलीस निरीक्षक कणकवली यांचा प्रतिकात्मक गौरव आज करण्यात आला, अमित यादव यांनी हा गौरव स्विकारला व आभार व्यक्त केले, या प्रसंगी जेष्ठ नागरिक संघाचे दादा कुडतरकर, प्रवासी संघटनेचे मनोहर पालयेकर, निवृत्त कर्मचारी संघटनेचे प्रकाश करंगुटकर, आणि रिक्षा संघटनेचे संजय मालंडकर उपस्थितीत होते, कणकवली पोलीस स्टेशन चे कर्मचारी सुध्दा बहुसंख्येने उपस्थिती होते