कणकवली (प्रतिनिधी): तालुक्यातील तोंडवली बोभाटेवाडी येथे शुक्रवारी मध्यरात्री एक च्या सुमारास घरातील अंगणात लाइट मिटर मध्ये शॉर्टसर्किट झाल्याने त्याच अंगणात उभे असलेल्या तेजस सहदेव बोभाटे यांच्या मालकीच्या तीन दुचाकी जळून खाक झाल्याची घटना घडली असून यामध्ये दोन 2 लाख 55000 चे नुकसान झाले आहे. दरम्यान, यामध्ये दोनच दिवसांपूर्वी बजाजची सिटी ९९ हजार ५०० रुपये किंमतीची दुचाकी खरेदी केली होती. तीही दुचाकी जळून खाक झाली आहे. यामध्ये एकूण दोन लाख 55 हजार 500 रुपये नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी तलाठी सुदर्शन अलकुटे, फोंडाघाट आऊट पोस्टचे हवालदार माने, नांदगाव विज वितरण विभागाचे अभियंता पंडित, तोंडवली पोलिस पाटील विजय मोरये आदी उपस्थित होते.