कणकवली (प्रतिनिधी): स्वच्छता हीच सेवा या उपक्रमांतर्गत कणकवली तालुक्यातील वागदे ग्रा पं च्या वतीने गावातील सरपंच संदीप सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत गणपती सान्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गणेश विसर्जन नंतर साचलेले निर्माल्य आणि अन्य कचरा संकलित करून नदीकिनारा स्वच्छ करण्यात आला. यावेळी उपसरपंच शामल गावडे, ग्रामसेवक युवराज बोराडे, ग्रा पं सदस्य नीलम पालव, सुप्रिया काणेकर, सुनिधी आर्डे कर यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.
वागदे ग्रा पं ने गणपती सान्यावर राबवली स्वच्छता मोहीम












