कणकवली (प्रतिनिधी) : आमदार म्हटलं की थोडा वेगळाच आविर्भाव असणार , खाणे पिणे हे थोडे उंची असणार हे सर्वसामान्य जनतेच्या मनात गृहीत असते.पण या गृहिताला छेद देत नेहमीच आम जनतेत मिसळून काम करणारे आमदार म्हणून नितेश राणे यांची ओळख आहे. त्याचीच प्रचिती पुन्हा 7 ऑक्टोबर रोजी कणकवली एसटी बस स्थानकावर आली. आमदार नितेश राणे यांनी थेट एसटी स्टँडवरील रसवंती गृहात जाऊन सर्वसामान्य माणसाप्रमाणे उसाच्या रसाचा आस्वाद घेतला. ऑक्टोबर हिट सुरू झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी आपला गळा थंड करण्याचे लोकप्रिय ठिकाण म्हणजे रसवंती गृह. फ्रुट ज्यूस ची चंगळ खिशाला न परवडणारी असल्याने खेडोपाड्यातून येणारे गोरगरीब याच रसवंती गृहावर आपली तहान भागवतात. एसटी च्या नवीन स्लीपर बसचे उदघाटन करण्यासाठी आमदार नितेश राणे कणकवली बस स्थानकावर शनिवारी 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी आले होते. तेव्हा आमदार नितेश राणे यांनी एसटी स्टँडवरील रसवंती गृहात बसून उसाच्या रसाचा स्वाद घेतला. आमदार नितेश राणे यांना सर्वसामान्य माणसाप्रमाणेच कणकवली एसटी बस स्थानकात जाऊन उसाचा रस पिताना पाहून आमदार असले तरी आमच्यासारखेच साधे असल्याचे उदगार एसटी स्टँडवरील प्रवाशांनी काढले.