शिक्षण प्रसारक मंडळ कोळोशी हडपीड पदाधिकारी केलं अभिनंदन
कणकवली (प्रतिनिधी) : देवगड तालुकास्तरीय शालेय मैदान स्पर्धेत कोळोशी – हडपीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. ही स्पर्धा शेठ म ग हायस्कूल येथे पार पडली. १४ वर्षांखालील मुलींच्या वयोगटामध्ये गोळाफेक प्रकारात स्वानंदी सुतार हिने प्रथम क्रमांक मिळवला. तर उंचउडी प्रकारात गायत्री इंदप हिने द्वितीय क्रमांक मिळवला. १७ वर्षांखालील मुलींच्या वयोगटामध्ये गोळाफेक प्रकार आयुषी कदम हिने द्वितीय क्रमांक मिळवला. उंचउडी प्रकारात सानिका पडवळ हिने द्वितीय क्रमांक मिळवला. लांबउडी प्रकार रिद्धी ओटवकर हिने तृतीय क्रमांक मिळवला. या विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ कोळोशी हडपीडचे अध्यक्ष व पदाधिकारी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालकांनी अभिनंदन केले.
ओरोस येथील क्रीडा संकुलात पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत शील गोळाफेक प्रकार माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी- हडपीडची विद्यार्थिनी स्वानंदी सुतार हिने १४ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक मिळवला. तिची सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल तिचे शिक्षण प्रसारक मंडळ कोळोशी-हडपीडचे अध्यक्ष व पदाधिकारी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालकांनी अभिनंदन केले.