देवगड तालुक्याचे पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये भरघोस यश संपादन

देवगड (प्रतिनिधी): वेंगुर्ले येथे नुकत्याच संपन्न झालेल्या नाईक जिम आणि कोकण सिंधु पॉवरलिफ्टिंग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत वायंगणकर्स जिमच्या मुलांनी भरघोस यश संपादन केले. यशस्वी स्पर्धक या प्रमाणे ठरले.
वेदा साटम – सबज्युनिअर गोल्ड मेडल, सिनिअर ब्रॉन्झ मेडल- ५७ किलो वजनीगट
यशश्री परब – सबज्युनिअर गोल्ड मेडल, सिनिअर सिल्व्हर – ७६ किलो वजनी गट
नेहा लाड- ज्यूनिअर गोल्ड मेडल सिनिअर सिल्व्हर मेडल६३ किलो वजनीगट
पुनम विश्वकर्मा – ज्यूनिअर गोल्ड मेडल सिनिअर सिल्हर मेडल ६९ किलो वजनीगट
टिना चौगुले मास्टर- १ गटात गोल्ड मेडल, सिनिअर सिल्व्हर मेडल स्ट्रॉंग वुमन मास्टर महिला
श्रेयस धुवाळी- सबज्युनिअर गोल्ड५३ किलो वजनीगट
गतिक परब- सबज्युनिअर सिल्व्हर मेडल ७४ किलो वजनीगट आराध्य चौगुले सबज्युनिअर गोल्ड मेडल ५९ किलो वजनीगट
विशाल लाड – ज्यूनिअर सिल्व्हर मेडल ६६ किलो वजनीगट
सौराज परब- ज्यूनिअर सिल्वर मेडल ६६ किलो वजनीगट
समर्थ भावे- ज्यूनिअर गोल्ड मेडल ९३ किलो वजनीगट
प्रदीप नारकर- सिल्व्हर मेडल -मास्टर वन ८३ किलो वजनीगट
शशांक साटम – मास्टर वन गोल्ड मेडल ७४ किलो वजनीगट
सुरेश कदम गोल्ड मेडल ६६ किलो वजनीगट
दिप जाधव ज्यूनिअर सिल्व्हर मेडल ७४ किलो वजनीगट
ओंकार कुबडे गोल्ड मेडल ९३ किलो वजनीगट
लौकीक पाटील सबज्युनिअर ब्राँझ मेडल ५३ किलो वजनीगट
तिर्थेश करगुटकर सबज्युनिअर सिल्व्हर मेडल ७४ किलो वजनीगट
तौसिफ शेख – गोल्ड मेडल ८३ किलो वजनी गट सबज्युनिअर स्ट्रॉग बॉय हे वी वेट डेडलिफ्ट
गोविंद कळंबटे मास्टर वन गोल्ड मेडल स्ट्रॉगमॅन
गणेश वायंगणकर ८३ किलो वजनीगट गोल्ड मेडलसिनिअर स्ट्रॉगमॅन आणि स्ट्रॉ गमन सिंधुदुर्ग
रुशीकेश तेली ८३ किलो वजनीगट ज्यूनिअर गोल्ड मेडल ज्यूनिअर स्ट्रॉ ग मॅन

वरीलप्रमाणे देवगड तालुक्यातील स्पर्धकांनी यश संपादन केले या स्पर्धेसाठी पंच म्हणून संजय साटम तसेच गणेश वायंगणकर यांनी काम पाहिले स्कोरर म्हणून सायली घारे, योगेश राणे, शशांक साटम यांनी काम पाहिले या स्पर्धेतील खेळांडूना यश प्राप्त होण्यासाठी संजय साटम व गणेश वायंगणकर यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!