देवगड (प्रतिनिधी): देवगड तालुक्यातील मुणगे सडेवाडी यांचे शेजारी राहणारे रुपेश रमेश धुवाळी यांना दारूसह रंगेहात पकडून केस केल्यामुळे व त्यावेळी पंचनामा वेळी हजर राहून सही केल्याप्रकरणाच्या रागाने आपल्या तसेच वाडीतील महिला साक्षी संदीप धुमाळी, वासंती अनिल धुवाळी वगैरे महिलांना मनास लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे अश्लील शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद रिया योगेश धुवाळी (३०) यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली सदरची घटना ११ ऑक्टोबर रात्रौ ९.३० च्या सुमारास मुणगे सडेवाडी येथे घडली. या घटनेतील संशयित आरोपी रुपेश रमेश धुवाळी (४०) रिद्धी रुपेश धुवाळी रा. मुणगे सडेवाडी यांच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात भा. द. वि. कलम ३५४ अ (1) (iv),५०९,५०६,३४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला हेड कॉन्स्टेबल वनिता पडवळ करीत आहेत. अन्य दुसऱ्या घटनेत घराजवळ गैरकायदा जमाव करुन, काठीने दुखापत करुन, विनयभंग करुन, फिर्यादीचे समंत्ती शिवाय लबाडीच्या इरादयाने मोबाईल चोरून, पाण्याने भरलेले ड्रम ओतून फोडून नुकसान केले व घरात डांबून शिवीगाळी करुन मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद रिद्धी रुपेश धुवाळी (३२) रा मुणगे सडेवाडी यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. सदरची घटना ११ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० च्या मानाने मुणगे सडेवाडी येथे घडली आहे. यातील संशयित आरोपी प्रदीप रघुनाथ धुवाळी वय – ५० वर्षे, साक्षी संदीप धुवाळी वय ३८ वर्ष, दीपाली दीपक धुवाळी वय – ५० वर्षे ,रिया योगेश धुवाळी वय ३५ वर्षे, योगेश मुरारी धुवाळी वय – ३८ वर्षे, सर्व रा. मुणगे सडेवाडी ता. देवगड ,मनोज सखाराम सावंत वय ४२ वर्षे रा. मुणगे वाघोळेवाडी ता. देवगड यांच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात भा. द. वि. कलम १४३, १४८,३४१, ३२४ ३५४(अ )(1)(iv), ३७९,४२७,५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम करीत आहेत.