कनेडी त जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; मोरजकर सह 5 जणांवर कारवाई

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी शिवाजीनगर येथील सावंत यांच्या घराकडील पाण्याच्या टाकीजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्यासह सहकारी पोलिसांनी 29 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यावेळी जुगार खेळताना सिद्धेश महादेव मोरजकर, निलेश मनोहर हेरेकर, संदीप दीनकर गोळवनकर, सुजित जयवन्त बाईत, राजेश शांताराम परब याना रंगेहाथ पकडण्यात आले.त्यांच्याकडून रोख रक्कम 44 हजार व मोबाईल जप्त करण्यात आले. कारवाईत हवालदार राजेंद्र बाईत, हवालदार विनोद चव्हाण,चालक एएसआय उबाळे, कॉन्स्टेबल किरण मेथे,राहुल राऊत, शैलेश म्हेत्रे सहभागी झाले होते.

error: Content is protected !!