कुडाळ तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने कुडाळ तहसीलदाराना निवेदन
कुडाळ (प्रतिनिधी): सकल मराठा समाज बांधव सुरुवातीपासूनच या ‘मराठा आरक्षण’ मागणी संदर्भात सक्रियपणे काम केलेले आहे. अनेक मोर्चात सहभागी होत आम्ही शांततेत अनेकदा ती मागणी केली आहे. या सरकारने अनेक बैठकातून या विषयी सकारात्मकता दर्शवलेली आहे आणी भुमीका स्पष्ट केली आहे.आम्ही सर्व परिस्थितीत खंबीर पणे सरकारच्या पाठीशी आहोत. आम्हा मराठा समाजाची पुर्ण खात्री आहे की हे सरकार आमच्या मागणीनुसार कायद्याच्या कसोटीवर कोर्टात टीकणारे आणि कोणत्याही समाजावर अन्याय न करणारे,कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावणारे असे शाश्वत आरक्षण देण्याचे प्रामाणिक प्रयत्न करित आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी शिवरायांची शप्पथ घेत हे सरकार आरक्षण देण्यास कटिबद्ध असल्याची जाणीव ही मराठा समाजाला करून दिली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे ही प्रामाणिक पणे अभ्यासपूर्ण काम सुरू आहे त्याला अधिक गती मिळून आरक्षण लवकरात लवकर मिळावे यासाठीच आमची ही मागणी सरकार दरबारी सादर व्हावी. सखाराम सकल मराठा समाज पुढच्या वतीने कुडा तहसीलदार अमोल पाठक यांना सादर करण्यात आले यावेळी श्री. दादा साईल, संजय वेंगुर्लेकर, विनायक राणे, दिपक नारकर, बंड्या सावंत,नागेश आईर, निलेश परब, सौ. अदिती सावंत, सौ. साधना माडये, अभी गावडे, राजेंद्र राणे, चंद्रशेखर राणे, कृष्णा सावंत, विलास राणे,सुनिल गायकवाड,संजय वालावलकर, प्रभाकर चव्हाण, कैलास यादव, साजुराम नाईक, समीर घाडीगावकर, सागर राणे विलास राणे आदी उपस्थिती होते.











