आंतरराष्ट्रीय एकपात्री अभिनय स्पर्धेत सत्यवान गावकर प्रथम

कणकवली (प्रतिनिधी) : मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून SK प्रोडक्शन हाऊस यांनी आंतरराष्ट्रीय एकपात्री अभिनय स्पर्धा योजित केली होती. जगभरातून या स्पर्धेला चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता. 31 ऑक्टोबर रोजी unseen kokan या youtube वाहिनीवर सर्व स्पर्धकांचे व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आले. प्रेक्षकांची आवड आणि परीक्षकांचे मत लक्षात घेऊन उकृष्ट सादरीकरण करणाऱ्या स्पर्धकांची निवड करण्यात आली.५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी unseen kokan instagram live वरून विजेत्या स्पर्धकांची नावे sk प्रोडक्शन हाऊसचे संस्थापक सचिन कोंडस्कर,प्रसिद्ध अभिनेत्री रुचिता शिर्के,युवा अद्योजक आणि या स्पर्धेचे प्रायोजक जयतीर्थ राऊळ,या स्पर्धेला लाभलेले संयोजक हर्षवर्धन जोशी यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.आंतरराष्ट्रीय एकपात्री अभिनय स्पर्धा 2023 यातील विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे तृतीय क्रमांक विभागून गजेंद्र कोठावळे आणि आर्य आढव,द्वितीय क्रमांक आकाश सकपाळ,प्रथम क्रमांक सत्यवान गावकर.विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेच्या प्रसिद्धी साठी तन्वी मुंडले,रुचिता शिर्के,विश्वजीत पालव,आद्या कोयंडे,निलेश गुरव,अक्षता कांबळी,विवेक वाळके,सिद्धेश चव्हाण यांनी व्हीडियोच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही स्पर्धा पोहचव्यासाठी प्रयत्न केला.त्याच बरोबर डॉ.प्रणव प्रभू,बंटी कांबळी,मंदार शेटिये यांनी विविध माध्यमातून ही स्पर्धा घराघरात पोहचव्यासाठी प्रयत्न केले. या स्पर्धेचे परीक्षण करण्याची मुख्य जबादारी अमित अनंत घाडगे मुंबई(लेखक दिग्दर्शक casting director),जयेश कांबळे मुंबई(लेखक दिग्दर्शक) यांनी स्वीकारून ही जबादारी योग्यरीत्या पार पाडली. या सर्व मंडळींचे sk प्रोडक्शन हाऊसच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.

याच बरोबर १४ नोव्हेंबर बालदिनाचे औचित्य साधून sk प्रोडक्शन हाऊस बाल एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करीत आहे.यासाठी व्हिडीओ पाठवण्याची अंतिम तारिख ही ११ नोव्हेंबर २०२३ असणार आहे. १२ नोव्हेंबर २०२३ रोजी सर्व व्हिडिओ एकाच दिवशी Unseen Konkan या यूट्यूब चॅनल ला पोस्ट केले जातील . या स्पर्धेचा निकाल १४ नोव्हेंबर २०२३ रोजी Unseen Konkan या इंस्टाग्राम पेज वरून संध्याकाळी ५ वाजता लाईव्ह सांगितला जाईल. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.तरी सर्व स्पर्धकांनी लवकरात लवकर आपली नाव नोंदणी करून या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन sk production house चे संस्थापक सचिन कोंडस्कर यांनी माध्यमांबरोबर बोलताना केले.

error: Content is protected !!