कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यंदा पाऊस फारचं कमी झाल्यामुळे पाण्याची पातळी आत्ताचं कमी झाली आहे. त्यामुळे कणकवली तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील सर्व के.टी. बंधाऱ्यात पाणी लवकरात लवकर अडवून पाण्याचा साठा केल्या मुळे एप्रिल, मे महिन्यात होणारा पाण्याचा दुष्काळ थोड्याफार प्रमाणात कमी होईल.
तसेच पाणी अडवण्यासाठी ज्या प्लेट वापरल्या जातात त्या चांगल्या दर्जाच्या असाव्यात जेणेकरून अडविलेले पाणी वाहून जाऊ नये. याची काळजी घेण्यात यावी. असे सुचविण्यात आले.
उपकार्यकारी अभियंता संदीप निखारे यांच्याशी चर्चा करते वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी पाण्याचा वापर केला जात नाही. अशी खंत व्यक्त केली. त्याचप्रमाणे आपल्या निवेदनाचा विचार करून लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. निवेदन देतेवेळी उपस्थित लघु पाटबंधारे विभाग सिंधुदुर्ग नगरी कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक विजय खोचरे तसेच ह्यूमन राईट असोसिएश











