कोळोशी गावात कचरा संकलन होणार जलद

नवीन घंटागाडी कोळोशी वासीयांच्या सेवेत दाखल

कणकवली (प्रतिनिधी): स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत गावामधील कचरा संकलित करण्यासाठी बॅटरीवर चालणारी घंटागाडी ग्रामपंचायत कोळोशीच्या माध्यमातून खरेदी करण्यात आली. नवीन घंटागाडी आज ग्रामपंचायत मध्ये दाखल झाली.सरपंच श्री गुरुनाथ आचरेकर यांनी गाडीचे विधिवत पूजन केले याप्रसंगी उपसरपंच अतुल गुरव , ग्रामसेवक मंगेश राणे ,ग्रा.प.सदस्य सुचिता पोकळे, मीनाक्षी जाधव ,सिद्धार्थ तांबे ,सुशिल इंदाप,अनुजा आचरेकर , ग्रा.प. कर्मचारी संतोष तावडे, पूर्वा तांबे ,अंगणवाडी सेविका सान्वी चव्हाण मदतनीस ज्योत्स्ना व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.गावातील स्वच्छता चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या घंटागाडीचा निश्चितच उपयोग होणार आहे.

error: Content is protected !!