आगीत शेती अवजारे सह गोठा जळून खाक…
सुमारे ८०,००० हजार रुपये नुकसान
खारेपाटण :- (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावा नजिक असलेल्या कुरंगवणे, बौद्धवाडी या गावातील ग्रामस्थ श्री सिद्धार्थ गणपत सांगेलकर यांच्या कोलवा असलेल्या गुरांच्या गोठ्याला आज दुपारी २.०० च्या सुमारास अचानक आग लागल्याने शेती अवजारे सह गुरांचा गोठा आगीत जळून खाक झाला.दरम्यान गोठ्यात गुरे नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. तर घटनेची माहिती मिळताच कुरगावणे गावचे सरपंच श्री. पप्पू ब्रम्हदंडे यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन
याबाबत अधिक वृत्त असे की कुरगावणे बौद्धवाडी येथील रहिवासी श्री सिद्धार्थ गणपत सांगेलकर यांचा वाडीच्या शेजारी असलेल्या गुरांच्या गोठ्याला आज दुपारी २.०० वाजता भर उन्हाच्या वेळी अचानक आग लागून गोठा आगीत जळून खाक झाला.तर याबरोबरच गोठ्यात ठेवलेली सर्व शेती अवजारे तसेच लाकूड फाटा देखील जळून गेल्यामुळे श्री सिद्धार्थ सांगेलकर यांचे मोठे नुकसान झाले आहे. गोठ्याला आग लागलेली समजताच स्थानिक नागरिकांनी तातडीने पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला.मात्र भर दुपारी आग लागल्यामुळे ती अधिकच भडकली व गोठ्याच्या शेजारी त्यांचे भात शेतीचे गवत आर्थत उडवे सुद्धा जळून गेले असते.गुरांच्या वैरणीचा प्रश्न निर्माण झाला असता.ती वाचवण्यात यश आले. यामध्ये श्री सांगेलकर यांचे खूप मोठ्या प्रमाणमध्ये नुकसान झाले असून गावचे पोलीस पाटील श्री रतन राऊत,तलाठी श्री आम्रासकर भाऊ,ग्रामसेवक श्री गिरीश धुमाळे, कोतवाल समीर राणे,माजी सरपंच सरिता पवार, विशाखा राऊत,ज्ञानेश्वर राऊत यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. महसूल विभागाच्या वतीने झालेल्या नुकसानीची पंचयादी घालण्यात आली.सुमारे ८०,००० हजार रुपये एवढे अंदाजे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.