कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : उद्योजक बनण्यासाठी योग्य मानसिकता असणे गरजेचे आहे. युवकांना उद्यमशील बनवण्यासाठी पालकांनी लहानपणापासूनच त्यांना प्रोत्साहन देत राहावे. तळकोकणातील बंदरास जोडला जाणारा रेल्वे मार्ग व राज्य महामार्गामुळे येत्या काळात कोल्हापूर हे लॉजीस्टिक हब बनेल असे प्रतिपादन आय टी असोसिएशनचे माजी अध्यक्ष विनय गुप्ते यांनी केले.
‘आप’ युवा आघाडी आयोजित ‘युगंधर’ व्यवसाय परिषदेमध्ये बोलताना ते म्हणाले “कोणताही उद्योग करायचा झाल्यास त्याचा परिपूर्ण अभ्यास गरजेचा आहे. त्यासाठी ‘बिझनेस मॉडेल कॅनव्हास’ या ऑनलाइन टूलचा वापर प्रत्येकाने करावा”
बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक साक्षरता केंद्राचे समुपदेशक उदयकुमार जोशी यांनी बँकेची कर्जप्रक्रिया, कागदपत्रांची पूर्तता आणि त्याचे महत्व व नवउद्योजकांना मिळणाऱ्या शासकीय योजनांबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. सृष्टी शेळके, रोहित हवालदार, मुग्धा सावंत, मुजीब मुजावर, समीर यादव, कांचन चंदवानी, राहुल कांबळे या नवउद्योजकांचा सत्कार करण्यात आला.
‘आप’ युवा आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सिद्धेश भगत, राज्य संघटक संदीप सोनावणे, खजिनदार सी ए योगेश इंगळे, संदीप देसाई, निलेश रेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.युवा जिल्हाध्यक्ष उत्तम पाटील, उपाध्यक्ष अभिषेक पाटील, आदम शेख, शहराध्यक्ष मोईन मोकाशी यांची मनोगते झाली.कार्यक्रमासाठी प्रथमेश सूर्यवंशी, पौर्णिमा निंबाळकर, प्राजक्ता डाफळे, समृद्धी पाटील, ओंकार पताडे, मयूर भोसले, राम शिंगाडे, वीरभद्र सपाडलं, राज कोरगावकर, दिग्विजय चिले, साद शिलेदार, बसवराज हदीमनी, गणेश वडर, सुयश जगताप यांनी परिश्रम घेतले. विश्वराज जोशी यांनी सूत्रसंचालन केले.