कणकवली (प्रतिनिधी): बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल, कणकवली येथे दिवाळी साजरी करण्यात आली. मुलांना उटण्याचा महत्त्व पटवून देत व उटणे बनवायचा उपक्रम राबविला. प्रत्येक वर्गाच्या बाहेर रंगीबेरंगी रांगोळी काढून मुलांनी दिवाळी उत्सुकतेने साजरी केली. प्रत्येक वर्गांमध्ये आकाशकंदील लाऊन मुलांनी वर्ग सजावट केली. दिवाळी साजरी करण्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावरील हास्यद्वारे प्रकट होत होता. ग्रीटिंग कार्ड्सच्या माध्यमातून मुलांनी शिक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. अनिरुद्ध शिक्षण प्रसार संस्थेच्या सेक्रेटरी सौ. सुलेखा राणे यांनी मुलांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शालेच्या मुख्याध्यापिका सौ. गीतांजली कुलकर्णी यांनी मुलांना उटण्याचे महत्त्व सांगत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास रमेश राणे सर, संदीप सावंत सर, प्रणाली सावंत मॅडम, अभिजीत सावंत सर, सापळे सर, झगडे सर यांची उपस्थिती लाभली. या उपक्रमास शिक्षकांचे देखील सहकार्य लाभले.