कोकणातील नाथपंथी गोसावी समाजाचा १९ नोव्हेंबर रोजी कौटुंबिक स्नेहमेळावा

चौके (अमोल गोसावी) : मुंबई ते सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत पसरलेल्या संपूर्ण कोकण पट्ट्यातील समस्त नाथपंथी गोसावी समाजाच्या विविध संस्थांनी एकत्र येऊन कोकण विभाग नाथपंथी गोसावी महासंघाची स्थापना केलेली आहे.

या महासंघाच्या माध्यमातून आरक्षणा अंतर्गत होणाऱ्या अन्याया विरूद्ध लढा देणे,नाथपंथी गोसावी समाजाच्या मुलामुलींच्या शैक्षणिक प्रगती साठी विविध उपक्रम राबविणे व त्यांची आर्थिक उन्नती करणे, विवाहाची समस्या सोडविण्यासाठी वधूवर परिचय मेळावा आयोजित करणे,आपल्या पारंपरिक विधीचे जतन करणे,समाजातील जेष्ठ समाज बांधवांचे मार्गदर्शन शिबीर भरविणे, नाथपंथी गोसावी समाज भवन उभारणे इत्यादी उद्दिष्टये साध्य करण्यात येणार आहेत.

अशा या कोकण विभाग नाथपंथी गोसावी महासंघाचा पहिला कौटुंबिक महामेळावा रविवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत समाज मंदिर हॉल,शासकीय वसाहत,वांद्रे (पुर्व) मुंबई ५१ येथे महासंघाचे अध्यक्ष,गणेश परशुराम गोसावी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.

या महामेळाव्यामध्ये महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ,वधूवर परिचय कार्यक्रम,समाजातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते,वरीष्ठ पदावरील अधिकारी,डॉक्टर,वकील,इंजिनियर,दूरदर्शन मालिकांमधून यशस्वी झालेल्या व समाजाचा नावलौकिक वाढविलेल्या तसेच राज्य व जिल्हा स्तरावरील स्पर्धेत विजेतेपद प्राप्त मुलामुलींच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

या महामेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून गाथा नवनाथांची या लोकप्रिय दूरदर्शन मालिकेचे निर्माते व दिग्दर्शक संतोष अयाचित तसेच महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय दूरदर्शन मालिकेचे निर्माते सचिन गोस्वामी हे उपस्थित राहणार आहेत.

या कौटुंबिक स्नेहमेळाव्यासाठी कोकणातील समस्त नाथपंथी गोसावी बंधु भगिनींनी उपस्थित रहाण्याचे आवाहन कोकण विभाग नाथपंथी गोसावी महासंघाचे अध्यक्ष,गणेश प. गोसावी यांनी केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!