अजून किती अपघातानंतर पिडब्ल्यूडी ला जाग येणार ? युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोकें चा सवाल

हरकुळ भाट दुकान येथे मोटरसायकल घसरून दोघे जखमी

अन्यथा पिडब्ल्यूडी समोर ठिय्या आंदोलनाचा इशारा

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली कनेडी मार्गाच्या दुरावस्थेकडे वारंवार लक्ष वेधून, रस्ता दुरुस्ती व नूतनीकरण साठी निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. खराब रस्त्याचा फटका वाहन चालकांना होत असून आज सकाळी पुन्हा एकदा कणकवली कनेडी मार्गावर हरकुळ भाट दुकान येथील वळणावर मोटरसायकल घसरून अमोल देसाई व योगेश देसाई हे दोघे युवक जखमी झाले.त्यातील एक जायबंदी झाला आहे. अजून किती अपघातानंतर पिडब्ल्यूडी ला जाग येणार आहे ? की जीवितहानी झाल्यावर अधिकारी जागे होणार आहेत ?असा संतप्त सवाल शिवसेना उबाठा चे युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोकें यांनी केला आहे.असे अपघात होऊनही रस्ता दुरुस्ती आणि नूतनीकरण कडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दुर्लक्ष करत असतील तर पिडब्ल्यूडी ऑफिससमोर युवासेना ठिय्या आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही उत्तम लोकें यांनी दिला.दरम्यान आज सकाळी अपघातात जखमी झालेल्या दोन्ही युवकांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय उपचार सुरू आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!