मसुरे (प्रतिनिधी) : प्रा. मधु दडवते यांचा १७ वा स्मृतिदिन बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे साजरा करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रा मधू दंडवते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. दीपक भोगटे यानी प्रास्ताविकात मधु दंडवते यांच्या विज्ञाननिष्ठ समाजवादी व्यक्तिमत्वाचा आढावा घेतला. त्यांच्या सोबतच्या अनेक आठवणी सांगितल्या. त्यांच्या सोबत काम करण्याची मिळालेली संधी म्हणजे आमच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचे क्षण असे मनोगत व्यक्त केले. किशोर शिरोडकर यानीही आपल्या दंडवते यांच्यासोबतच्या अनेक आठवणीना उजाळा दिला. प्रमुख पाहुणे महेद्र महाभोज यानी
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सिध्दार्थ कॉलेज मध्ये प्रा मधु दंडवते यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून काम केले. अन अखेर पर्यंत समतेचा विचार व विज्ञाननिष्ठता सोडली नाही याचा आवर्जून उल्लेख केला. शोभा म्हाडगुत यानी दंडवते यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेच्या अनेक आठवणी जागवल्या. भास्कर आकेरकर सर यांनी कोकण रेल्वेच्या रुपाने महाराष्ट्रावर प्रा. दंडवते यांचे उपकार असून त्यांना महाराष्ट्रातील जनता कधीही विसरणार नाही असे मत व्यक्त केले. यावेळी आकाशकंदील व भेटकार्ड स्पर्धेतील गुणवंताना शैक्षाणिक भेटवस्तू व प्रशस्तीपत्रके मान्यवरांचे हस्ते देण्यात आली. सर्व मुलांना नरेंद्र दाभोलकर यांची अंधश्रद्धा निर्मूलावरील पुस्तके भेट देण्यात आली .मधु दंडवते सेवानिधीचे वितरण १० होतकरू विदयार्थिनीना करण्यात आले. यावेळी शिवण क्लासच्या विद्यार्थिनीना विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास महेंद्र महाभोज, भास्कर आकेरकर, बापू तळवडेकर, किशोर शिरोडकर, गंगाराम गावडे, शोभा म्हाडगुत, सुजाता पावसकर, श्रीधर गोंधळी,विदया चिंदरकर, अरुण पावसकर, सतिश कांबळी, पाटील, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.