देवगड (प्रतिनिधी) : सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचारी कला क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवात आयोजित क्रिकेट स्पर्धेत देवगड पंचायत समितीने पुन्हा एकदा बाजी मारली आहे बाजी मारली. सलग पाच वर्षे देवगड पंचायत समितीने आपले क्रिकेट स्पर्धेतील विजेतेपद कायम राखले आहे.
या या कला व क्रीडा सांस्कृतिक महोत्सवात पंचायत समिती देवगडचे गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती देवगडने सर्वच क्रिडा विभागात लक्षवेधी कामगिरी केली. यामध्ये सांघिक पुरूष गट क्रिकेट अंतिम सामन्यात देवगड कर्णधार दिपक मयेकर यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग संघावर रोमहर्षक विजय मिळवत पटकावले सलग पाचव्या वर्षी क्रिकेट स्पर्धेतील प्रथम विजेतेपद कायम राखले आहे. कबड्डीमध्ये कर्णधार आनंद जाधव यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी संघावर सहज मात करत दिमाखदार विजेतेपद पटकावले .खो खो मधे देवगड तालुका उपविजेता ठरला तर हॉलीबॉल स्पर्धेत केवळ एक गुणाच्या फरकाने उपविजेतेपद पटकावले.तर वैयक्तिक पुरुष गटात १०० व २०० मीटर धावणे प्रथम क्रमांक सुनिल कोदले, थाळी फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक ग्रामसेवक आदित्य कदम तर महिलांमध्ये भाला फेक द्वितीय क्रमांक शितल मयेकर,गोळा फेक(दिव्यांग ) प्रथम क्रमांक अश्विनी सावंत,बुद्वधीबळ (दिव्यांग) प्रथम क्रमांक कुंदा बोंडाळे, कॅरम (दिव्यांग) प्रथम क्रमांक अश्विनी सावंत,द्वितीय क्रमांक,कुंदा बोंडाळे, तर ४०० मिटर धावणे तृतीय क्रमांक भारती आसरोंडकर यांनी पटकावला.
सांस्कृतिक कार्यक्रमातही कक्ष अधिकारी संतोष बिर्जे यांची लावणी ठरली.तसेच पंचायत समिती देवगडच्या गोंधळाला मिळाली सर्वाची पसंती तर देवगड शिक्षण विभागाने सादरीकरण केलेले नृत्य त्याला सचिन जाधवसर यांनी दिलेली अप्रतिम साथीला रसिकांनी चांगली दाद दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी देखील सचिम जाधव यांचे विशेष अभिनंदन केले.
या संपूर्ण स्पर्धेत गटशिक्षण अधिकारी प्रजापती थोरात,कक्ष अधिकारी संतोष बिर्जे,अधिक्षक कुणाल मांजरेकर,अधिक्षक मेधा राणे, विस्तार अधिकारी अंकुश जंगले, विस्तार अधिकारी निलेश जगताप यांचे मार्गदर्शन मोलाचे केले .












