मसुरे कावावाडी येथील रस्त्याचे भूमिपूजन
मसुरे (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील मसुरे कावावाडी येथे केंद्रीय मंत्री नारायणराव राणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आणि माजी खासदार भाजप नेते निलेश राणे यांच्या सहकार्यातून जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मंजुरी मिळालेल्या रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करणे या कामाचा भूमिपूजन समारंभ भाजप नेते निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरोज परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. मसुरे कावावाडी येथील ग्रामस्थांच्या मागणी नुसार या रस्त्यासाठी दहा लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गेली कित्येक वर्षाची या रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरणाची येथील ग्रामस्थांची मागणी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण माजी खासदार निलेश राणे आणि भारतीय जनता पक्षाने पूर्ण केल्याने कावावाडी ग्रामस्थांनी या सर्वांचे आभार मानले आहेत. यावेळी निलेश राणे बोलताना म्हणाले, मसुरे गाव हा राणे परिवाराचा आवडता गाव असून येथील विकासात्मक सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा आमचा मानस राहील. येथील उर्वरित रस्त्याचे सुद्धा काम लवकरच पूर्ण करण्यासाठी निधी मंजूर करण्यात येईल आणि उर्वरित रस्ताही पूर्ण करून दिला जाईल.यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, छोटू ठाकूर, सरोज परब, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, निलेश खोत, उधोजक दया देसाई, जीवन मूणगेकर, वेरली सरपंच धनंजय परब, प्रेरणा येसजी, वासूदेव पाटील, अनंत भोगले, पुरुषोत्तम शिंगरे, सतीश मसूरकर, भंडारी समाज अध्यक्ष पंढरीनाथ मसुरकर, तात्या हिंदळेकर, बाबू येसजी, दीपक हिंदळेकर, किरण पेडणेकर, सतीश मसुरकर, किरण पाटील, बंटी मुणगेकर, देवानंद कांबळी, बाबुराव गोलतकर, बंड्या करंजेकर, रघु राऊत, बाळू मालवणकर, ओमकार हडकर, अरुण गिरकर, विष्णू गिरकर, मोहन मसुरकर, विश्वास मसुरकर, अरुण आंबेरकर, सागर पाटील आणि कावावाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मसुरे कावावाडी भंडारी समाजसेवा संघाच्या वतीने दीपक हिंदळेकर यांनी निलेश राणे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंढरीनाथ मसुरकर यांनी करून मसरे कावावाडीतील विविध विकास कामे आणि पर्यटनातून गावाचा विकास याबाबत माजी खासदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले. यावेळी धोंडी चिंदरकर, सरोज परब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.