फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमुळे जिल्ह्याच्या दर्जेदार रुग्णसेवेत भर – खा. विनायक राऊत

डॉ. शरण चव्हाण यांचे फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णसेवेत दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉ शरण चव्हाण यांनी फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केले हे कौतुकास्पद आहे अशा हॉस्पिटलची सिंधुदुर्गला गरज होती या हॉस्पिटलच्या माध्ममातून रुग्णांना निश्चितच चांगली सेवा मिळेल असे प्रतिपादन  रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी केले

कणकवली येथे डॉ शरण चव्हाण यांनी विविध आरोग्य सेवा देणाऱ्या जिल्ह्यातील नामांकित डॉक्टरांना एकत्र करून फिनिक्स मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल सुरू केले त्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी झाला या शुभारंभ प्रसंगी सकाळच्या सत्रात खासदार विनायक राऊत यांनी हॉस्पिटलला भेट देऊन डॉ शरण चव्हाण माजी गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांची भेट घेऊन हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत कणकवली माजीनगराध्यक्ष संदेश पारकर माजी गटविकास अधिकारी विजय चव्हाण व्यवस्थापकीय संचालिका प्राची चव्हाण सचिन सावंत.सौं प्रतीक्षा पवार अभिषेक पवार आदी उपस्थित होते सायंकाळीं शुभारंभप्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे राजाराम सावंत डॉ आठवले डॉ सिद्धेश सपकाळ डॉ सागर कोल्हे  डॉ सद्गुरू पाटणकर डॉ विद्याधर तायशेटे डॉ  आंबेरकर डॉ मिलिंद कुलकर्णी डॉ सई धुरी डॉ संदेश कांबळे कलमठ सरपंच संदीप मेस्त्री डॉ गौरव घुर्ये डॉ बिरमोळे  डॉ सतीश पवार डॉ प्रमिला पाटणकर डॉ विशाल रेड्डी डॉ नेहा पावसकर डॉ सुनील पाटील डॉ शरद सावंत डॉ अक्षय पाटील डॉ प्रेमलता पाटणकर डॉ संजय बायकोडी सुहास वरुणकर अभय खडपकर के टी चव्हाण पंढरी चव्हाण सुजित जाधव शैलेश भोगले राजू शेट्ये मनोहर आंबेकर चंद्रसेन पाताडे मनोहर सरमळकर पांग्रड गावचे मानकरी गावपूरूष अजित मर्गज आनंद मर्गज रामचंद लिंगायत यशवंत तांबे बाळा घाडी कलमठचे गावपुरूष सुनील नाडकर्णी रघुनाथ चव्हाण श्रीराम चव्हाण सुहास वरुणकर सौ वरुणकर रवि पोवार पूजा पिंगुळकर संजय आरोसकर आर डी जंगले महादेव तेली पांग्रड गावचे ग्रामस्थ जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर्स कुडाळ पंचायत समितीचे कर्मचारी हॉस्पिटल स्टाफ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी बोलताना खासदार राऊत म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात मल्टीपेशालिटी हॉस्पिटलची गरज होती ती गरज कुडाळचे माजी गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्यामुळे पूर्णत्वास गेली आहे  वैद्यकीय क्षेत्रात पदवी घेऊन वाटचाल करणारे डॉक्टर्स हे मुंबई पुणे अन्य मोठ्या शहरातील हॉस्पिटलकडे वळतात मात्र डॉ शरण चव्हाण यांनी आपल्याच लाल मातीत ही सेवा सुरू करून सर्वसामान्यांसाठी सेवा देण्यासाठी कटिबद्ध झाले आहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे माजी गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी आपल्या कारकिर्दीत पंचायत समितीत विविध राज्य पुरस्कारात यशाची दैदिप्यमान वाटचाल केली त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून डॉ शरण व त्यांची टीम निश्चितच या आरोग्य क्षेत्रात निश्चितच मानवसेवा समजून कार्यरत राहतील सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी कटिबद्ध राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हाधिकारी श्री तावडे यांनी या  ठिकाणी डॉ शरण यांनी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल उभे करून ते व  त्यांची सर्व टीम निश्चितच रुग्णांना चांगली सेवा देतील विशेष म्हणजे अद्ययावत सेवा सुविधा आणि परिपूर्ण असणारे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णांसाठी निश्चितच आरोग्याच्या दृष्टीने पर्वणी ठरेल असे सांगून शुभेच्छा दिल्या  विजय चव्हाण यांनी या मातीत राहून रुग्णांची सेवा करावी या उदात्त भावनेतून फिनिक्स हॉस्पीटल सुरू केले हे तुमचे हॉस्पिटल आहे असे समजा आरोग्याच्या सेवा देताना काय उणिवा असतील तेवढ्यासुद्धा तुम्ही हक्काने सांगाव्यात असे सांगितले सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले सर्व मान्यवरांचे स्वागत डॉ शरण चव्हाण यांनी केले.

error: Content is protected !!