सुमारे १ लाख ४६ हजार ८०० रूपये रकमेची दंडात्मक कारवाई
देवगड (प्रतिनिधी) : देवगड तहसिलदारांनी अवैध चिरे व वाळू वाहतुक करणा-यांवर धडक कारवाई मोहिम राबविली असून सोमवारी अवैध चिरे वाहतुक करणा-या ट्रकवर लिंगडाळ तिठा येथे कारवाई करून १ लाख ४६ हजार ८०० रूपये रकमेचा दंड ठोठावला आहे.
देवगड तहसिलदार रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तळवडे मंडल अधिकारी व वळीवंडे तलाठी यांनी सोमवारी सायंकाळी ४ वा.सुमारास qलगडाळ तिठा येथे अवैध चिरे वाहतुक करणा-या ट्रकवर कारवाई केली.हा ट्रक देवगड तहसिल कार्यालय परिसरात आणण्यात आला असून टड्ढकवर सुमारे १ लाख ४६ हजार ८०० रूपये रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.