शिवडाव येथील दत्तात्रय हरिश्चंद्र लाड बेपत्ता

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील शिवडाव (ओटोसवाडी) येथील रहिवासी दत्तात्रय हरिश्चंद्र लाड (वय 50) हे 20 नोव्हेंबर पासून कणकवली येथून बेपत्ता असल्याची फिर्याद आत्माराम लाड यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे.दत्तात्रय लाड हे गोव्यातील म्हापसा येथे एका हॉटेलमध्ये कामाला आहेत. शिवडाव येथील आपल्या घरातून ते 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता घरातून बाहेर पडले.दुपारी साडेबाराच्या गाडी ने गोव्यात कामाला जात असल्याचे त्यांनी आपली पत्नी व मुलीला फोनवरून सांगितले. मात्र ते गोव्यात कामाच्या ठिकाणी पोचले नाही.त्यांचा आज शोध घेऊनही ठावठिकाणा सापडला नाही, तसेच त्यांचा मोबाईल सुद्धा बंद आहे. त्यामुळे त्यांचे भाऊ आत्माराम लाड यांनी ते बेपत्ता असल्याची फिर्याद कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे.अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत. सदर व्यक्ती कोणाला आढळल्यास बबलू सावंत मोबाईल नंबर 9422373164 /9561305150 अथवा कणकवली पोलीस ठाणे दूरध्वनी क्रमांक 02367 – 232033 यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!