कलमठ उड्डाणपुलावर डॉ. करंबेळकर यांच्या कारला अपघात

आमदार नितेश राणेंनी घटनास्थळी डॉ करंबेळकर यांची केली विचारपूस

कणकवली (प्रतिनिधी) : हुंबरठ वरून कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या वॅगनार कारचा बुधवारी दुपारी 1.30 च्या सुमारास अपघात झाला. यामध्ये कारचे पुढील चाक तुटून पडल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले. हा अपघात नेमका कसा झाला हे माहीत नसले तरी सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. असणाऱ्या एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. नितेश राणे यांचा ताफा कणकवलीच्या दिशेने येत असताना अपघात झाल्याचे दिसतात नितेश राणे यांनी गाडीतून उतरून जखमींची विचारपूस केली. यावरून आ नितेश राणे याना आपल्या जनतेची काळजी असल्याचे दिसून आले.

error: Content is protected !!