कै. सत्यविजय भिसे यांच्या समाजसेवेचा वारसा आत्मसात करणे गरजेचे- आ. वैभव नाईक

शिवडाव येथे कै. सत्यविजय भिसे यांचा २१ वा. स्मृतिदिन साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : कै. सत्यविजय भिसे यांचे समाजाभिमुख कार्य तरुण पिढीला समजावे यासाठी सातत्याने गेली २१ वर्षे कै. सत्यविजय भिसे यांचा स्मृतिदिन साजरा केला जातो. त्यांनी ग्रामीण भागात केलेल्या समाजकार्यामुळे जनतेच्या मनात त्यांच्याप्रति प्रेम आणि आपुलकीची भावना अजूनही कायम आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा भिसे कुटूंबिय जपत आहे. तरुणपिढीने देखील त्यांचा समाजसेवेचा वारसा आत्मसात करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले.

कै. सत्यविजय भिसे मित्रमंडळाच्या वतीने शिवडाव येथे कै. सत्यविजय भिसे यांचा २१ वा. स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भिसे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,माजी नगरसेवक कन्हैया पारकर,उद्योजक सतीश नाईक,माजी जि.प. सदस्य बाळा भिसे, मोहन सावंत, तेली सर, वाळके सर,रंजन चिके,शिवडाव सरपंच नितीश भिसे, विलास गावकर,दिलीप मरये,सचिन आचरेकर,संजय पारकर,भास्कर राणे,नंदकिशोर परब, श्रीकांत तेली, नितीन गावकर, गणेश शिवडावकर, सत्यविजय जाधव,नितीन हरमलकर, महेश शिरसाट,सुनील हरमलकर,मधू चव्हाण, संतोष मुरकर, अना नानचे,प्रमोद सावंत, सत्यविजय परब आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!