बळीराम भिवा राणे यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील घोणसरी बोंडगवाडी येथील बळीराम भिवा राणे (वय 102 वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने येथे निधन झाले. मुंबई येथील न्यू ग्रेट इंडिया या मिलमधून बळीराम राणे हे निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, एक विवाहित मुलगी, नातवंडे,पतवंडे असा परिवार आहे.

माजी केंद्रप्रमुख भिवा बळीराम राणे, राष्ट्रपती पदक विजेते रिटायर्ड सुभेदार अशोक बळीराम राणे, बेळणे खुर्द शाळेचे पदवीधर शिक्षक मंगेश राणे यांचे ते वडील होत. तर किर्लोस भावेवाडी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका मानसी मंगेश राणे यांचे सासरे होत.

error: Content is protected !!