३० नोव्हेंबर रोजी प्रबोधनात्मक व्याख्यान आणि १ डिसेंबर रोजी श्री. गणेश याग व दशावतारी नाट्यप्रयोग
चौके ( अमोल गोसावी ) : श्री स्वामी प्रतिक्षा भक्ती सेवा मंडळ , पळसेवाडी , बिबवणे श्री गजानन ध्यान मंदिर बिबवणे येथे गुरुवार ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता आरती , महाप्रसाद त्यानंतर दुप्पट २ वाजता शाश्वत सुखी जिवनासाठी अध्यात्म या विषयावर व्याख्याते प्रा. श्री. रुपेश पाटील यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ : ३० वाजता श्रींची पालखी सायं. ७ ते ९ वाजता श्री दत्तकृपा भजन मंडळ नांदोस यांचे सुश्राव्य भजन आणि रात्रौ. ९ वाजता महाप्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे . त्याचप्रमाणे शुक्रवार दिनांक १ डिसेंबर रोजी सकाळी ८ : ३० वाजता श्री. गणेश याग , दुपारी १ वाजता आरती व महाप्रसाद , दुपारी ३ वाजता श्री स्वामी समर्थ भजन मंडळ घारपी यांचे सुश्राव्य भजन आणि सायंकाळी ७ वाजता नाईक मोचेमाडकर पारंपारिक दशावतार लोकनाट्य मंडळ मोचे माड वेंगुर्ला यांचा ” पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तिन्ही लोकी डंका हा पारंपारिक नाट्यप्रयोग होणार आहे. तरी दोन दिवस होणाऱ्या या धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी प्रतिक्षा भक्ती सेवा मंडळ , पळसेवाडी , बिबवणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.