कणकवली (प्रतिनिधी): कोकणगांधी आप्पासाहेब पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या गोपुरी आश्रम वागदे च्या सचिवपदी विनायक ऊर्फ बाळू मेस्त्री यांची व्यवस्थापक मंडळाच्या सभेत एकमतांनी निवड करण्यात आली.सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्री हे हरहुन्नरी युवा कार्यकर्ता म्हणून सर्वांना परिचित आहेत. गेली चार वर्षे ते गोपुरी आश्रमाच्या कार्यकारी मंडळाचे संचालक सदस्य म्हणून कार्यरत आहेत. कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांचे कार्य समाजात तळागाळात जाण्यासाठी युवकांनी गोपूरीच्या युवाकामाला जोडून घेण्याची गरज असल्याचे मत गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी आवाहन केले आहे. बाळू मेस्त्री यांची सचिवपदी निवड झाल्याने गोपुरी आश्रमाच्या कामाला गती मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. बाळू मेस्त्री यांचे गोपुरी आश्रमाच्या सचिव पदी नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.