सोनू सावंत यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव ; रक्तदान शिबिरात 160 रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

कणकवली (प्रतिनिधी): भाजपा कणकवली उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.आमदार नितेश राणे यांनी मोबाईलवरून सोनू सावंत याना वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा दिल्या. सोनू सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोनू सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त वरवडे गावातील जिल्हा परिषदच्या तीन  प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. तब्बल 160 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) दक्षिण मुंबई च्या सचिव भारती हेगडे यांच्या हस्ते  फीत कापून आणि भाजपा कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पूण करण्यात आले. भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, आशिये सरपंच महेश गुरव , देवगड माजी सभापती रवी पाळेकर व अन्य मान्यवरांच्या  हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. केक कापून सोनू सावंत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सोनू सावंत यांच्या सुविद्य पत्नी माजी पं स सदस्या राधिका सावंत, वरवडे  उपसरपंच अमोल बोंद्रे, वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ रुपाली वळंजू, माजी नगरसेवक भाई परब, जिल्हा बँक संचालक समीर सावंत, शिरगाव माजी उपसरपंच अमित साटम, पिसेकामते सरपंच प्राजक्ता मुद्राळे, माजी सरपंच सुहास राणे, सुशील सावंत, सामाजिक कार्यकर्ते संतोष चव्हाण, सातरल माजी सरपंच प्रदीप राणे, मोहनदास हेगडे, सल्लाउद्दीन कुडाळकर, विजय कोदे, कासरल उपसरपंच मनोहर मांडवकर, वरवडे तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत बोंद्रे ,पपू पुजारे , गोपी लाड आदी उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त सोनू सावंत मित्रमंडळाच्या दिनदर्शिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे शुभेच्छा देताना म्हणाले की, सातत्याने तब्बल 12 वर्षे रक्तदान सारख्या सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करणारे समाजाभिमुख व्यक्तिमत्व म्हणजे सोनू सावंत होय. परखड तेवढाच दिलदार स्वभाव असल्यामुळेच सोनू सावंत यांच्या मागे शेकडो युवा कार्यकर्त्यांची फळी उभी असल्याचे दिसून येते. आर्थिक श्रीमंती असून उपयोगाची नाही तर गरजूना गरजेला सहकार्य करण्याची दानत महत्वाची असते जी सोनू सावंत यांच्यात आहे. शून्यातून विश्व निर्माण करताना आपल्या मित्रपरिवाराला जीवनात स्थैर्य मिळण्यासाठी मदतीचा हात सोनू सावंत देतात.  यावेळी बोलताना भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे म्हणाले की, परखड स्वभावाचा असला तरी अत्यंत मायाळू मनाचे सोनू सावंत होय. वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिरासारखे सेवाभावी कार्यक्रम करण्यामागे समाजाचे दुःख समजून घेण्याची वृत्ती असावी लागते. समाजाच्या दुःखात नेहमी मदतीचा हात सोनू सावंत नेहमीच देताना दिसतात.  12 वर्षांपूर्वी रक्तदान शिबिराचे लावलेले हे सामाजिक उपक्रमाचे रोपटे आज मोठ्या स्वरूपात दिसत आहे.केंद्रीयमंत्री राणे आणि आमदार नितेश राणेंना अभिप्रेत असणारे समाजकार्य सोनू सावंत अव्याहत करत आहेत. रवी पाळेकर म्हणाले की वाढदिवसानिमित्त रक्तदान सारखा सामाजिक उपक्रम राबवत सोनू सावंत यांनी अनेक गरजू रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी रक्ताचे नाते जोडले आहे. गोरगरिबांच्या अडचणीत त्यांच्या हाकेला धावून जाणारे व्यक्तीमत्व म्हणजे सोनू सावंत असल्याचे गौरवोद्गार पाळेकर यांनी काढले. यावेळी बोलताना सत्कारमूर्ती राजेंद्र उर्फ सोनू सावंत म्हणाले की माझ्या वाढदिवसानिमित्त गेली 12 वर्षे रक्तदान सारखा कार्यक्रम आयोजित करून गरजू रुग्णांना रक्तपुरवठा आमच्या मित्रमंडळाचे कार्यकर्ते करतात. विज्ञानाने मोठी झेप घेत मानवी शरीराला आवश्यक अनेक कृत्रिम अवयव तयार केले आहेत.मात्र अद्याप निसर्गनिर्मित असणारे मानवी रक्त हे कृत्रिम बनवले जाऊ शकत नाही. जेव्हा एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज असते तेव्हा ही गरज फक्त रक्ताने भागवता येते. दरवर्षी दीडशेहून अधिक ब्लड बॅग संकलन केले जाते. याचे श्रेय उत्स्फूर्तपणे स्वेच्छेने रक्तदान करणारे रक्तदाते, कार्यकर्ते आणि हितचिंतक याना असल्याचे सोनू सावंत म्हणाले. यावेळी भारती  हेगडे, भाई परब, सुशील सावंत , अमित साटम आदी मान्यवरांनी मनोगतातून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन संदेश तांबे यांनी केले तर आभार महेश गुरव यांनी मानले.

error: Content is protected !!