पळसंबमध्ये चिरे वाहक ट्रकला अपघात,समोर आली धक्कादायक माहिती

मालवण (प्रतिनिधी): पळसंब मालवण तालुक्यातील चिरे उत्पादनचे प्रमाण सर्वाधिक असलेले गाव.गावातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांतून चिरे वाहतूक होत असते. परंतु,हिच चिरे वाहतूक नागरिकांसाठी असुरक्षित होत आहे. मंगळवारी संध्याकाळी पळसंब-बुधवळे सडा येथे दगड वाहतूक करणार्‍या दहा टायर ट्रकच्या भिषण अपघातात झाला. सदर ट्रकमध्ये चिरे भरलेले होते. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. अपघात झाल्यानंतर चालक पसार झाला आहे.गाडीचा पुढील एक्सल तुटला असून दोन्ही चाके वेगळी झाली आहेत. दुर्दैवाने वर्दळीच्या वेळी अपघात घडला असता तर जीवितहानीची शक्यता होती. कारण सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पळसंबमधील शेतकर्‍यांची आणि गुरांची येजा असते. पळसंब परिसरात मोठ्या प्रमाणात चिरे वाहतूक होते. या अपघाताची माहिती आचरा पोलीस स्टेशनला आणि पोलीस पाटील सिताराम सकपाळ यांना माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी दिली. अपघातानंतर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले होते . पळसंब गावात उगवता सडा आणि बुधवळे सडा असे दोन सडे आहेत.या दोन्ही सड्यांवर मोठ्या प्रमाणात चिरेखाण व्यवसाय चालतो.यात या चिर्‍यांची वाहतूक करणार्‍या अवजड गाड्या गावातील रस्त्यांवर धावत असतात.गेल्या काही वर्षांपासून या अवजड ट्रकांविरोधात ग्रामस्थांनी तक्रार केल्या आहेत.अशा वाहनांमुळे गावातील रस्त्यांची देखील दयनीय अवस्था झाली आहे.याशिवाय खाणीवर शौचालय नसल्याने सड्यावर दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना शेतात ये- जा करणे गुरांच्या मागून फिरणे कठिण झाले आहे . त्यावर ग्रामपंचायत प्रशासन ,पोलीस खात्यासहीत महसूल विभागाने यावर लक्ष वेधून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी आणि ग्रामस्थांना होणार्‍या त्रासातून मुक्तता द्यावी, अशी मागणी माजी सरंपच चंद्रकांत गोलतकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने केली आहे.

error: Content is protected !!