कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदूर्गनगरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत तळेरे येथील योगेश वायंगणकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला असून त्यांची महाराष्ट्र श्री साठी निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि पुढिल स्पर्धेसाठी शुभेच्छा तळेरे ग्रामस्थ आणि विविध संघटनांकडून देण्यात आल्या. सिंधुदूर्गनगरी येथे झालेल्या या स्पर्धेत सिंधुदुर्ग श्री हा किताब त्यांनी मिळविला आहे. यापूर्वी फोंडा येथे झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेतही यश मिळविले होते. सिंधुदूर्गनगरी येथे झालेल्या या स्पर्धेत विजेते मिळाल्यामुळे त्यांची 16 फेब्रुवारी 2023 रोजी पुणे येथे होणार्या महाराष्ट्र श्री स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्व. सुनिल तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केलेल्या या सदिच्छा कार्यक्रमात योगेश वायंगणकर यांना सुर्यकांत तळेकर, ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, सरपंच हनुमंत तळेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी सुर्यकांत तळेकर म्हनाले की, योगेश आमच्या तळेरे गावची शान आहे. आपली सेवा बजावताना त्याने शरीर सौष्ठव ही आपली आवड पासली आणि आज महाराष्ट्र श्री साठी निवड झाली असून हा गावाचा अभिमान आहे. अशावेळी गावाने दिलेली पाठीवरची थाप सर्वात मोठी असते. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष चंद्रकांत तळेकर, वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर, शशांक तळेकर, शरद वायंगणकर, मनोज तळेकर, उदय पाटिल, संतोष परशुराम तळेकर, बापू वायंगणकर, अशोक तळेकर, हरिश्चद्र शेलार, अमोल सोरप, निकेत पावसकर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. यावेळी हरिश्चंद्र शेलार, बापू वायंगणकर यांनी मनोगत व्यक्त केले.
