कणकवली (प्रतिनिधी): बेळणे खुर्द गावचे शिवसेना शाखाप्रमुख तुकाराम सिताराम पुजारे यांचे काल आकस्मिक निधन झाले. त्यांचे 50वर्षे वय होते. काल रात्री अचानक त्यांच्या छातीत कळ येऊ लागल्याने उपचाराकरिता त्यांना कणकवली प्राथमिक रुग्णालयामध्ये घेऊन येत असतानाच वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली सरपंच अविनाश गिरकर यांचे ते मामा होते. त्यांच्या पश्चात पत्नी,1 मुलगा, 2 मुली असा परिवार आहे.त्यांच्या या आकस्मिक जाण्यान संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.