प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा दाखल करुन अटक करा

पुणे (ब्युरो न्युज) : राज्यात दंगली होऊ शकतात असं म्हणणारे वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, अशी मागणी केंद्रीय लघू सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणतात दंगली होऊ शकतात. खरंच राज्यात अशी परिस्थिती आहे का? असा प्रश्न नारायण राणे यांना विचारण्यात आला. त्यावर राणे म्हणाले, “त्यांच्यावर FIR दाखल करून त्यांना अटक व्हायला पाहिजे. त्यांना अटक करायला पाहिजे आणि माहिती घ्यायला पाहिजे. दंगलीचा आधार सांगा”.

नारायण राणे यांना पुन्हा त्याबाबतच विचारण्या आलं. त्यावर त्यांनी सावरासावरव केली. आंबेडकर असो किंवा इतर कोणीही, दंगलीविषयी बोलत असेल तर, पोलिसांनी त्यांच्याकडून माहिती घ्यायला हवी. त्यांची चौकशी करायला हवी. दंगली रोखण्यासाठी कारवाई करायला हवी, असं नारायण राणे म्हणाले. प्रकाश आंबेडकर असो किंवा इतर कुणीही असो, जे कोणी दंगलीविषयी बोलत असतील, त्याची पोलिसांनी दखल घ्यावी, त्यांची चौकशी करायला हवी. दंगलीची त्यांच्याकडे काय माहिती आहे ती घेऊन दंगल रोखण्यासाठी कारवाई करावी.दंगल रोखण्यासाठी अटक देखील करायला हवी. प्रकाश आंबेडकर यांच्यावर एफआयआर दाखल करून, त्यांना अटक व्हायला पाहिजे. त्यांना अटक करून दंगलीचा आधार काय आहे याची माहिती घ्यायला पाहिजे, असं नारायण राणे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!