सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कुणकेरी,ता.सावंतवाडी येथील सावंत भोसले कुळाची कुलदेवता व्यानमाता भवानी देवीच्या दर्शनाला आज गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे उपस्थित होते. त्यांच्यासमवेत कुलस्वामीनीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी सावंतवाडी संस्थानचे बाळराजे, युवराज लाखमराजे, माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तसेच सावंत भोसले कुळातील अनेक मान्यवर उपस्थित होते.