आचरा ( प्रतिनिधी) : यापूर्वी गेली कित्येक वर्षे हवामान मापक यंत्र खवणे येथे होते सदर यंत्र चुकीच्या जागी बसविण्यात आले होते त्यामुळे पर्जन्य तापमान मापन व्यवस्थित होत नव्हते या कारणामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळत नव्हती. सदर बाब म्हापण परिसरातील भाजपा च्या सर्व कार्यकर्ते यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या निदर्शनास आणून दिली वं नवीन यंत्र नवीन जागेत बसविण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला.यासाठी माजी आमदार राजन तेली जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी भाजपा कृषी सेल जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांचे वेळोवेळी खूप मोलाचे सहकार्य लाभले. आज या यंत्रा चे उदघाटन करण्यात आले. मागील वर्षी पीक विमा रक्कम भरपाई जिल्ह्यात 57 केंद्राना मिळाली परंतु म्हापण केंद्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ झाला नाही सर्व विमा भरणारे शेतकरी या नुकसान भरपाईस वंचित राहिले या संदर्भातील पीक विमा मागणीचे निवेदन सर्व शेतकरी बांधव यांनी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी साहेब यांच्याकडे दिले या मागणीचे पाठपुरावा करून पीक विमा रक्कम मिळवून देण्याचे आश्वासन मनीष दळवी यांनी दिले. यावेळी माजी सभापती निलेश सामंत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर कृषी सेल जिल्हाध्यक्ष उमेश सावंत महेश सारंग गुरुनाथ पाटील प्रसाद भोजने बाबली वायंगणकर कुशेवाडा सरपंच निलेश सामंत युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर प्रदीप प्रभू प्रकाश राणे महेश सामंत भोगवे चेअरमन चेतन सामंत भोगवे उपसरपंच रुपेश मुंडये कोचरा चेअरमन आपि फणसेकर नाथा मडवळ म्हापण चेअरमन आंनद गावडे गुरुप्रसाद चव्हाण म्हापण उपसरपंच सुरेश ठाकूर निवती मेढा सरपंच अवधूत रेगे ब्रिजेश तायशेटे चंदू गावडे सुभाष फणसेकर बांबजी हंजनकर अनिल सुतार योगेश राऊळ नारायण पिंगळे प्रसाद दाभोलकर सीताराम कोचरेकर बाबू राणे परुळे बाजार उपसरपंच संजय दूधवडकर गिरीश प्रभू ओंकार सामंत सतीश पुराणिक दया तेली सुरेखा तेली शरद हडकर भाऊ हडकर विठोबा राणे रोहिणी परब वैभवी मांडये कुशेवाडा उपसरपंच महादेव साफळे सिद्धेश मांडये गणपत माधव यासह बहुसंख्येने परुळे परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.