कोकणातील युवा पिढीला रोजगार हेच भाजपाचे मिशन
सहयाद्री पट्यातील रोप वे देणार पर्यटनाला नवा आयाम
कणकवली (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणूक प्रमुखपदी माझी नियुक्ती केल्यानंतर संपूर्ण रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात महाविजय संपर्क दौरा सुरू केला आहे. यानंतर मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद मतदारसंघात आम्ही महाविजय संपर्क दौरा अभियान सुरू करणार आहोत. या मतदारसंघात बेरोजगारी हा प्रमुख कळी चा मुद्दा समोर येत आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली कोकणातील युवा पिढीला रोजगार मिळवून देणे याला आम्ही प्राधान्य देत आहोत.400 पेक्षा जास्त खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुती चे निवडून येतील.कोकणातील सर्व समस्या दूर करणे आणि रोजगार निर्मिती मधून घर घर प्रवास आणि हर घर मोदी चा नारा आम्ही देत आहोत. पंतप्रधान मोदी उद्या 4 डिसेंम्बर रोजी नौदल दिना निमित्त सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणार आहेत. ज्या भागात मोदी जातात त्या भागाचा विकास तिप्पट वेगाने होतो .मोदी ऍप च्या माध्यमातून 18 ते 20 कोटी जनतेपर्यंत उद्याचा नौसेना दिन पोचणार आहे.तट माध्यमातून संपूर्ण जगभरातील भारतीयांपर्यंत आपला सिंधुदुर्ग जिल्हा जाईल.जगाच्या पर्यटनाच्या नकाशावर सिंधुदुर्ग जाणार आहे असे भाजपा सचिव तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रमुख प्रमोद जठार यांनी दिली. केंद्र सरकारच्या नॅशनल हायवे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 80 रोप वे ची निर्मिती केंद्रीय परिवहन मंत्रालय महाराष्ट्र सरकारशी करत आहे. 75 % सहभाग निधी च्या स्वरूपात केंद्राचा तर 25 % सहभाग जागा उपलब्ध करून देणार आहे. या योजनेत गगनबावडा गगनगिरी महाराज गड ते वैभववाडी आणि आंबोली ते सावंतवाडी किंवा नरेंद्र डोंगर ते सावंतवाडी रोप वे करावा अशी मागणी परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांकडे केली असल्याचेही जठार म्हणाले. यातून सह्याद्री पर्वत रांगांचा वापर वेगळ्या बाजूने पर्यटनासाठी करता येणार आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातही 2 रोप वे सुचविले आहेत अशी माहिती जठार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, बबलू सावंत विजय चिंदरकर , समीर प्रभुगावकर ,प्रज्वल वर्दम आदी उपस्थित होते.