पळसंब शाखाप्रमुख पदी वैभव सावंत तर युवासेना शाखा प्रमुख पदी कपिल मुणगेकर….!

आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पळसंब येथे व्यायाम शाळेचे भूमीपूजन

आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाच्या माध्यमातून पळसंब येथे व्यायाम शाळेसाठी ७ लाख रुपये मंजूर झाले होते. सदर निधीतून इमारतीचे बांधकाम होणार आहे. आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज देवस्थान मानकरी प्रकाश (अण्णा) कापडी यांच्या हस्ते भूमीपुजन सोहळा संपन्न झाला.

यावेळी देवस्थान मानकरी अनिल पुजारे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादा गावकर, देवस्थान अध्यक्ष रमेश परब, उपाध्यक्ष मधुकर कदम, राजन पुजारे, बबन पुजारे, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश पुजारे, माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, पळसंब उपसरपंच अविराज परब, ग्रामपंचायत सदस्य अक्षय परब, स्मिता परब जुवेकर, रुतुजा सावंत, शाखा प्रमुख पिंट्या सावंत, कपील मुणगेकर, मेघशाम जुवेकर, अनिल परब, अमित पुजारे, देऊ सावंत, दिनेश साईल, रतिका गोलतकर, पुनम गोलतकर, वंदना चिंचवलकर, मगेश सावंत, अक्षता परब, जयेद्र परब, मधुकर सावंत तसेच या सोहळ्याला शिवसैनिक, आचरा विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख अनिल गांवकर, युवा सेना उपविभाग प्रमुख छोटु पांगे, सोसायटी चेअरमन श्रीकांत बागवे, अरविंद साटम, संदिप तेली, त्रिंबक ग्रामपंचायत सदस्य सागर चव्हाण उपस्थित होते. यावेळी वैभव वसंत सावंत यांची पळसंब गावाच्या शाखाप्रमुख पदी तर कपिल कृष्णा मुणगेकर यांची युवा सेना शाखाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!