खारेपाटण येथे 67 वा महापरिनिर्वाण दिन संपन्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विषमतेकडून समानतेकडे नेणारी – सचिन कोर्लेकर

खारेपाटण (प्रतिनिधी): ” या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नंतर सुद्धा येथील वर्णव्यवस्थेच्या जातीयतेत अनेक वर्ष खितपत पडलेल्या शोषित पीडित वंचित बहुजन वर्गाला गुलामगिरीतून मुक्त करणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा ही विषमतेकडून समतेकडे नेणारी असल्याचे प्रतिपादन बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेचे सचिव सचिन कोर्लेकर यांनी खारेपाटण पंचशील नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमात बोलताना काढले. बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या 12 गाव संघटनेच्या वतीने खारेपाटण बुद्ध विहार येथे “महामानवाला अभिवादन ” या कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला होता.या कार्यक्रमाला संघटनेने पदाधिकारी सागर पोमेडकर,गोपाळ जाधव,दीपक जाधव,अंकुश जाधव,सत्यवान जाधव महेंद्र कदम,संदीप सावंत,मंगेश कांबळे यांसह सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर, बुरबावडे गावचे माजी सरपंच रविंद्र शिंगे,कवि गायक विलास कुंकवणकर,पंचशील विकास मंडळ खारेपाटणचे जेष्ठ कार्यकर्ते मधुकर पाटणकर, गणपत पाटणकर,संघमित्रा महिला मंडळ खारेपाटणच्या अध्यक्षा आकांशा पाटणकर खारेपाटण संघटनेचे बौध्दचार्य संतोष पाटणकर राजापूर तालुका बौद्ध सेवा संघाचे बौध्दचार्य महेंद्र पवार आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेच्या वतीने खारेपाटण पंचशील नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास संघाचे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे व सचिव सचिन कोर्लेकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यानंतर “महामानवाला अभिवादन ” या घेण्यात आलेल्या कार्यक्रमात कवि गायक रवींद्र शिंगे, विलास कुंकवणकर,सागर पोमेडकर यांसह 12 गाव संघटनेतील काही सदस्यनो भिम बुद्ध गिते सादर करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहिली.तर आयोजोत अभिवादन सभेत अध्यक्ष चंद्रकांत कांबळे यांच्यासह 12 गावातील प्रत्येकी एका पदाधिकाऱ्यांने आपले मनोगत व्यक्त केले.या संपूर्ण कार्यक्रमाला स्थानिक पंचशील विकास मंडळ खारेपाटणचे मोलाचे सहकार्य लाभले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र कदम व आभार सागर पोमेडकर यांनी मानले.

error: Content is protected !!