राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचा सामाजिक उपक्रम ; स्वखर्चाने जानवली नदीवर बांधला बंधारा

कणकवली जानवली परिसरात जलपातली वाढण्यास होणार मदत

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत स्वखर्चाने जानवली नदीवर गणपती साना येथे बंधारा बांधला. यावेळी प्रांतिक सदस्य विलास गावकर, शहराध्यक्ष इम्रान शेख, शहर उपाध्यक्ष अमित केतकर, गणेश चौगुले, तालुका सरचिटणीस उदय सावंत, संतोष कोकाटे आदी उपस्थित होते. अबिद नाईक हे मागील 16 वर्षे जानवली नदीवर बंधारा बांधतात.यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे भूगर्भातील जलपातळी आटू लागली आहे. त्यामुळे जानवली तसेच कणकवली शहरातील नागरिकांकडून लवकर बंधारा बांधावा अशी मागणी अबिद नाईक यांच्याकडे केली होती.जनतेची मागणी लक्षात घेत अबिद नाईक यांनी तात्काळ जानवली नदीवर स्वखर्चाने बंधारा बांधला. यावेळी बोलताना अबिद नाईक म्हणाले की मागील 16 वर्षे याठिकाणी मी बंधारा बांधत आहे.यावर्षी झालेल्या अल्पबवृष्टीचा फटका कणकवली शहर तसेच जानवली गावातील विहिरींना बसला आहे. विहिरींची पाणी पातळी ऐन डिसेंम्बर महिन्यात कमी झाली आहे. बंधारा बांधून अडवले पाणी मुरल्यामुळे साहजिकच परिसरातील पाणीपातळी वाढणार आहे. याचा फायदा परिसरातील ग्रामस्थांना होणार आहे.

error: Content is protected !!