देवगड (प्रतिनिधी) : देवगडच्या समुद्रामध्ये पुणे चिंचवड येथील सैनिक स्कूलच्या चार विद्यार्थिनीचा बुडून मृत्यू झाला. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी आज घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली. बुडालेल्यांपैकी राम डिचोलकर हा विद्यार्थी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास डिचोलकर यांचा मृतदेह देवगड किल्ला येथील स्मशानभूमीच्या खडकात पोलिसांना आढळून आली स्कुबा डायव्हिंगची पथके मरीन पोलीस बोट यांच्यासह अनेक मच्छीमार राम डिचोलकरचा शोध घेत आहेत.आज पहाटेपासून प्रांताधिकारी जगदीश कातकर तहसीलदार आर.जे. पवार यांच्यासह महसूल ची टीम देवगड किनारपट्टीवर राम डीचोलकरच्या शोधकार्यात लक्ष ठेवून आहे.यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी जगदिश कातकर,तहसीलदार रमेश पवार, तसेच मंडल अधिकारी ,तलाठी व अन्य उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे हे समुद्रकिनारी शोध मोहिमेवर बारकाईने नजर ठेवून आहेत.रविवारी साय.३.४५ च्या सुमारास बेपत्ता विद्यार्थ्यांचा मृतदेह देवगड स्मशानभूमी नजिकच्या समुद्र किनारी भागात पोलीस स्पीड नौकेस सापडला.२४ तासांच्या शोध मोहीमेनंतर राम डिचोलकर याचा मृतदेह सापडला आहे.मयत विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा रमेश डोंगरे(२१, रा.घरकुल चिखली पुणे), अनिषा नितीन पवळ(१९, रा.चिखली ताम्हाण वस्ती), अंकिता राहूल गलाटे(२१, कृष्णनगर चिखली), पायल राजू बनसोडे(२१, चिखली पुणे) यांचे मृतदेह सवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
समुद्रात बुडालेल्या राम डिचोलकर चा मृतदेह आढळला देवगड किल्ला भागात












