आचरा (प्रतिनिधी) : चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज चिंदर ग्रामपंचायत व सहकारी खरेदी विक्री संघ मालवण यांच्यावतीने आयोजित पंतप्रधान उज्वला गँस कनेक्शन वितरण कार्यक्रमात 51 लाभार्थ्यांना सरपंच सौ. स्वरा पालकर व खरेदी विक्रि संघ चेअरमन राजन गांवकर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. तसेच अनेक लाभार्थ्यांची E-KYC करण्यात आली.
यावेळी बोलताना खरेदी विक्री संघ चेअरमन राजन गांवकर म्हणाले कि उज्वला गँस सारख्खा अनेक योजना मोदी सरकारने आणल्या आहेत. त्या तळागाळा पर्यंत पोहोचने गरजेच आहे. लोकांनी त्या माहित करुन त्याचा फायदा द्यावा. आचरा पंचक्रोशीत यावर्षी पंतप्रधान उज्वला गँस योजने अंतर्गत 100 पेक्षाही जास्त कनेक्शन देण्यात आली असून यापूढे योजना चालू असे पर्यंत प्रत्येक गावात पोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू.
यावेळी चिंदर सोसायटी माजी चेअरमन दिगंबर जाधव, संचालक विवेक परब, प्रिया पालकर, सिध्देश नाटेकर तसेच बहुसंख्य कर्मचारी वर्ग व लाभार्थी उपस्थित होते.