कणकवली (प्रतिनिधी) : हळवल-परबवाडी येथील प्रभावती सीताराम परब ( वय 77 ) यांचे वृद्धापकाळाने त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले. प्रभावती ह्या अत्यंत मनमिळावू व सुस्वभावी व्यक्ती म्हणून सर्व परिचित होत्या.त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हळवल ग्रामपंचायत माजी सदस्या सुजाता परब यांच्या त्या सासू तर कणकवली नगरपंचायत कर्मचारी सुभाष परब यांच्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात 2 मुलगे, सुना,मुली नातवंडे,पतवंडे,जाऊ,पुतणे असा परिवार आहे.